औरंगाबाद- महानगरपालिकेत गेल्या तीस वर्षातील 26 वर्षे शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता आहे. पण 26 वर्षांत शहराचा पाहिजे तसा विकास झाला नाही. याला जबाबदार युतीचे नेतृत्व आहे. सध्या शिवसेनेचा महापौर आहे. सेनेचा महापौर असताना सेनेच्याच नगरसेवकांची कामे होत नसल्याची ओरड केली जात आहे. सेना नेत्यांची ही ओरड म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा या उक्तीप्रमाणेच सत्ताधार्यांच्या उलट्या बोंबा म्हणावे लागेल. काही महिन्यांपूर्वी भाजपच्याच सदस्यांनीही कामे होत नसल्याची ओरड केली होती. सत्ताधारी नगरसेवकांच्या वॉर्डात विकास होत नाही तर मग दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी कुठे खर्च केला जातो, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महानगरपालिकेची स्थापना 1982 मध्ये झाली. सहा
वर्षे प्रशासक होता. त्यानंतर 1988 मध्ये पहिली
सार्वत्रिक निवडणूक झाली. पहिल्या पंचवार्षिकमध्ये चार वर्षे काँग्रेस आणि एक वर्ष
सेनेची सत्ता राहिली. त्यानंतर ते आतापर्यंत युतीची सत्ता आहे. पण गेल्या 26 वर्षांच्या काळात शहरातील रस्त्याची
अवस्था आहे तशीचा आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. सर्वाधिक पाणीपट्टी
वसूल करुनही चार दिवसाला पाणीपुरवठा होतो. पथदिव्यांची दुरवस्था झाली आहे.
आरोग्याचे तीन तेरा वाजले आहेत. शहर झपाट्याने वाढत आहे. सातारा-देवळाईचा समावेश
मनपात झाला. यापूर्वी मनपात 18 खेड्यांचा समावेश
करण्यात आलेला आहे. गुंठेवारी क्षेत्र वाढत आहे. युतीची सत्ता असतानाही सदस्य ओरड
करीत आहेत. मनपाचा अकराशे कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आहे. मग हा निधी जातो कुठे असा
प्रश्न उपस्थित केला जात आहे. यापूर्वी भाजपाचे उपमहापौर विजय औताडे यांच्या
नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन भाजपा नगरसेवकांच्या
वॉर्डात कामे होत नसल्याचाी तक्रार केली होती. तशीच तक्रार शुक्रवारी शिवसेनेचे
जिल्हाप्रमुख अंबादास दानवे व महानगरप्रमुख मा. आमदार प्रदीप जैस्वाल यांनी
पालिकेत अधिकारी-पदाधिकार्यांची बैठक घेऊन केली आहे. या बैठकीत सेना नगरसेवकांची
अधिकारी मंडळी कामे करीत नसल्याचे सेना स्टाईल झटका दाखविण्याचा इशारा दिला आहे.
मनपात अशी स्थिती का निर्माण झाली. मनपा आर्थिक डबघाईला का आली. या सर्वाला
जबाबदार कोण,
प्रशासन जर ऐकत नसेल तर मनपातील
पदाधिकारी यांच्ीयावर कारवाई का करीत नाही पण मनपातील काही सत्ताधारी नगरसेवकांचे
नातेवाईकच कंत्राटदारी करीत असल्याने ते अधिकार्यांशी जुळवून घेत असल्याने
सर्वसामान्य नगरसेवकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. हे सेना आणि भाजपच्या
वरिष्ठ नेत्यांना माहीत आहे. या नेत्यांमुळेच मनपात अशी परिस्थिती निर्माण झाली
आहे.
















